पूर्व विदर्भ

अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पार्सल, कुरीयरवर पोलिसांचा वॉच

वर्धा दिनांक 3 जून ( प्रतिनिधी)

अंमली पदार्थ नियंत्रणासाठी दोन समित्या 

 प्रतिबंधीत औषधे विक्री केल्यास कार्यवाही

 जिल्हाधिका-यांकडून समितीचा आढावा

     

अंमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हयात दोन वेगवेगळया समित्या गठीत करण्यात आल्या आहे. पोलिसांची महत्वाची भूमिका असलेल्या या समितीच्या बैठकीत अशा पदार्थांना प्रतिबंध घालण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा पार्सल, कुरीयरच्या माध्यमातून होत असल्याने यावर पोलिसांनी गुप्त पाळत ठेऊन कडक कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हा पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरिक्षक, अंमल पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यात काही ठिकाणी अंमल पदार्थ आढळून आल्याने शासनाने यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा स्तरावर दोन वेगवेगळया समित्या गठीत केल्या आहे. त्यात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय अंमल पदार्थ नियंत्रण समिती तर जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचा यात समावेश आहे. जिल्हा अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंमली पदार्थ नियंत्रणासाठी विशेष मोहिमेसह जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अंमली पदार्थांची तस्करी तसेच मागणी व पुरवठा बहुतांश वेळा पार्सल व कुरीयरच्या माध्यमातून होत असल्याने अशा पुरवठयावर गुप्त नजर ठेवली जाणार आहे. यासाठी टपाल विभागासह, खाजगी कुरीयर वितरकांना विशेष मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. नेदरलँन्ड या देशातून मॅग्झीनमध्ये एलएसडी पेपर या अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याने अशा पदार्थांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. खाजगी कुरीयर व्यवस्थापकांचा देखील यासाठी सहभाग घेतल्या जाणार आहे.

लगतच्या छत्तीसगड व तेलंगना या राज्यातून नागपूर येथून व तेथून जिल्हयात गांजा सारख्या अंमल पदार्थांची तस्करी केली जाते. त्यासाठी पोलिस पथकांना विशेष दक्षता घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहे. काही ठिकाणी अवैधरित्या गांजा व खसखसची लागवड होण्याची शक्यता असते. असे आढळून आल्यास स्थानिकांनी पोलिस प्रशासनास माहिती दयावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. अंमल पदार्थांची तपासणी करण्यासाठी तपासन्या कीटची पुरेशी उपलब्धता जिल्हयात करण्यात आली आहे.

काही ठिकाणी नशेसाठी प्रतिबंधीत खोकल्याच्या औषधांचा वापर केल्या जातो. असे आढळल्यास औषधी द्रव्ये व सौदर्यप्रसाधन अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई केली जातील. गुंगीसाठी देण्यात येणा-या औषधांचा पुरवठा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केल्या गेल्यास औषध विक्रेत्यांवर देखील कारवाई केली जाती. अंमली पदार्थांपासून सर्वसामान्य नागरिक व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी जिल्हाभर जनजागृती मोहिम देखील राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिका-यांना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!