महाराष्ट्र

किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 करण्याचा विचार :आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.

किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 करण्याचा विचार, आरोग्यमंत्री राजेश टापेंच मोठं विधान 

येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं पाहिजे. त्यासाठी किराणा दूकान हे 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली. याबाबतचा बदल कलेक्टर स्थरावावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाली.

दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक अॅक्टिव्हली काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, असा निर्णय झाला.

ऑक्सिजन हा महत्त्वाचा विषय आहे. आपण स्वत:चं साडेबाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन वापरत आहोत. पण त्याचबरोबर 300 मेट्रिक टन आपण बाहेरुन भिलाई, बिल्लारी आणि विशापट्टणम येथून आणतोय. त्यामुळे 1550 टन ऑक्सिजन दररोज महाराष्ट्रात आहे. येत्या 20 तारखेपर्यंत ऑक्सिजन कोट्यापर्यंत सांगितलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर आणखी ऑक्सिजनची गरज लागेल. पुढे आपण ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कलेक्टरने त्वरित निर्णय घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!