नागपूर

अवाजवी दराने वस्तू विक्री करणाऱ्या 31 आस्‍थापनांविरोधात कारवाई

नागपूर दिनांक 17 मई ( शहर प्रतिनिधी)

नागरिकांना 9404951828 या व्हॉट्स अपवर करता येणार तक्रार 

वस्तूंच्या छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या नागपूर विभागातील नामांकित 31 व्यापाऱ्यांविरोधात वजने व मापे विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा समावेश असल्याचे वैध मापन शास्त्र विभागाकडून प्राप्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

मिठाई खरेदी करताना डब्यासह वजन करणे, खरेदी केलेली वस्तू व्यापारी कोणतेही कारणे सांगून छापील किमतीपेक्षा जास्त दराने विकत असेल, छापील किमतीवर खाडाखोड केली असेल, त्यावर स्टीकर लावून विकत असेल, पॅकबंद वस्तूवर उत्पादकाचे नाव, पूर्ण पत्ताख्‍ उत्पादनाचा महिना व वर्ष, छापील किंमत, वस्तूचे व्यावहारिक नाव, वजन व ग्राहकांना तक्रारीसाठी ग्राहक तक्रार क्रमांक, ईमेल, तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव व पत्ता घोषित केलेला नसेल तर अशा आस्थापनाधारकांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी वैध मापन शास्त्र विभागाने आता 9404951828 हा व्हॉटस अप क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.

ग्राहकांनी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत त्यांची लेखी तक्रार करावी किंवा आवाज रेकॉर्ड करुनही या कार्यालयाच्या व्हॉटस अप नंबरवर नोंदवावी, असे आवाहन वैध मापन शास्त्र विभागाचे सह नियंत्रक पां. मा. बिरादार यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!