
महाराष्ट्र
तातडीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा,देशात बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसही उपलब्ध नाही :संजय राऊत
देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसही उपलब्ध नाही. हे दुसरे तिसरे काही नसून संपूर्णपणे गोंधळ माजल्याचे चित्र आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करावे. या अधिवेशनात कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या सद्यपरिस्थितीवर चर्चा व्हावी, असे संजय राऊत (Sanjay Raut)यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे