पश्चिम विदर्भ

मोटार वाहन शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी विहीत परिक्षा देणे अनिवार्य

यवतमाळ दिनांक 10 मे (प्रतिनिधी) :

 फसव्या जाहिरातींना बळी पडू नये

 ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे व मोटार ड्रायव्हिग स्कुलची होणार तपासणी

 

– केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करतांना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा प्रमुख उदेश हा संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हाचे व वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व याची महिती व जाणिव असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे वाहन चालकांमध्ये जबाबदारीची जणिव निर्माण होते.

यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास या परिक्षेचे महत्व पटवून देणे आवश्यक ठरते तसेच उक्त प्रणालीचा गैरवापर होणार नाही याची जाणीवदेखील करून देणे आवश्यक आहे.

मात्र शिकाऊ अनुज्ञप्ती व वाहन चालक अनुज्ञप्तीच्या चाचणीकरीता तात्कळ सेवा उपलब्ध केलेल्या धोरणाचा गैरफयदा सायबर कॅफे घेत असून आर. टी. ओ. मध्ये जाण्याची व टेस्टची गरज नसून फक्त फोटो व आधार कार्ड द्या आणि शिकाऊ अनुज्ञप्ती मिळवा तशी जाहीरात प्रसिध्द करून गैरव्यवहार सुरू असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

यासंदर्भाने महा ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे व मोटार ड्रायव्हिग स्कुल इत्यादी संस्थामध्ये परिवहन विभागामार्फत अचानक भेटी देऊन या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास अशा दोषी संस्थेवर संबंधित काद्यातील तरतुदीप्रमाणे व अर्जदारवर मेाटार वाहन अधिनियमाच्या कलमान्वये कारवाई करण्यात येवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!