पश्चिम विदर्भ

भावना गवळी यांना इडीचे समन्स, हजर राहण्याचे आदेश

विदर्भ दिनांक 29 एप्रिल ( प्रतिनिधी)

यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत.गवळी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील (Mahila Utkarsh Pratishthan) मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना त्यांना ईडीकडून (ed) समन्स बजावण्यात आलं आहे.(ED Summons to Bhavana Gawali news updates)

पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश या समन्समधून देण्यात आला आहे. चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. हरीश सारडा यांनी यांनी भावना गवळींची ईडीकडे तक्रार केली आहे.

सारडा यांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे नेके किरीट सोमय्या यांनी वाशीमला येऊन पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!