
गोंदियातील कोरोना बळींमध्ये बाहेरील राज्यातील रुग्ण सर्वाधिक: वडेट्टीवार
गोंदिया: गोंदियात कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हे सर्व रुग्ण केवळ गोंदियातील नसून बाहेरच्या राज्यातील आहेत, असं सांगतानाच गोंदियात उपचार घेण्यासाठी बाहेरच्या राज्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत आहेत, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे
गोंदियातील वैद्यकिय महाविद्यालयात काल 29 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ऑक्सिजन अभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र हे वृत्त खोटे असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. स्वत: विजय वडेट्टीवार यांनी गोंदियातील 29 मृतांमध्ये बाहेरील राज्यातील लोकांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे. तसेच ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त खोटं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.