महाराष्ट्र

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ईदपर्यंत मुदत : राज ठाकरे

महाराष्ट्र दिनांक 12 एप्रिल ( प्रतिनिधी)

राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी राज्य सरकारला ईदच्या सणापर्यंत मुदत देतो. तोपर्यंत राज्यातील सर्व मौलवींशी चर्चा करून मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला.

गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून मनसे मागे हटणार नाही. त्यामुळे मी राज्य सरकार आणि गृहखात्याला सांगतो की, आम्हाला राज्यात कुठलीही तेढ निर्माण करायची नाही.

महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचं नाही. ३ तारखेला ईद आहे. आज १२ एप्रिल आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने १२ मे ते ३ मे या काळात राज्यभरातील सर्व मौलवींशी चर्चा करावी. त्यानंतर मशिदींवरील भोंगे खाली आले पाहिजेत. त्यानंतर मनसेकडून कोणताही त्रास होणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मशिदींवरील भोंग्यांचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. परदेशातही अशाप्रकारच्या भोंग्यांवर बंदी आहे. मग तुम्ही तिकडे निमूटपणे ऐकताय ना? आमचाही गणपती आणि नवरात्र उत्सव असतो. त्यावेळी १० दिवसांमध्ये लाऊडस्पीकर्स लागतात. पण ते तेवढ्यापुरते असते. तेव्हाही लाऊडस्पीकर्स कमी लावले पाहिजेत. सणवाराला लाऊडस्पीकर्स लावणे मी समजू शकतो. पण ३६५ दिवस तुम्ही भोंगे लावता. ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितली.

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत टिप्पणी

ठाण्यातील पोलिसांना माझ्या गाड्यांचा ताफा लहानसहान संघटनांकडून अडवला जाणार आहे, याची माहिती मिळते. पण याच गुप्तचर यंत्रणांना शरद पवार यांच्या घरावर लोक जाणार आहेत, हे कळाले नाही, अशी खोचक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली.

या गुप्तचर यंत्रणांना सगळी माहिती असते.एखादा माणूस शिंकला तर तो साधा शिंकलाय की करोनाचा शिंकलाय, हेदेखील कळतं, असे सांगत राज ठाकरे यांनी गुप्तचर यंत्रणांच्या एकूणच भूमिकेविषयी शंका उपस्थित केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!