नागपूर

नागपूरच्या या भागात 10 आणि 11 एप्रिलला पाणीपुरवठा नाही

नागपूर  दिनांक 9 एप्रिल ( महानगर प्रतिनिधी)

७०० मी मी व्यासाच्या टाकळी सिम मुख्य जलवाहिनीवर – हिंगणा ती पॉईंट , बाबा सावजी जवळ -जियो केबल च्या कंत्राटदाराने आज सकाळी मोठे भगदाड पडल्यामुळे टाकली सिम जलकुंभावरील परिसरात पाणी पुरवठा आज विस्कळीत तर झालाच पण बरेच पिण्याचे पाणी वाया देखील गेले आहे.

नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या जलवाहिनी दुरुस्तीचे कार्य तातडीने हाती घेतले आहे . हे काम अत्यंत कठीण ठिकाणी असल्यामुळे ह्याला वेळ लागण्याची शक्यता आहे आहे . त्यामुळे जयताला जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ आणि टाकळी सिम जलकुंभ ह्या भागातील पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत (उद्या सकाळपर्यंत) बाधित राहणार आहे .

पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग

टाकली सिम जलकुंभ (हिंगणा टी -पॉईंट)

हिंगणा रोड, राजेंद्र नगर, कल्याण नगर, यशोधरा नगर, वासुदेव नगर, लुम्बिनी नगर, गाडगे नगर म्हाडा कॉलोनी, सुर्वे नगर, आदर्श नगर, प्रगती नगर, त्रिमूर्ती नगर, सुभाष नगर, अध्यापक ले आउट , नेल्को सोसायटी, मंगलधाम सोसायती , दाते ले आउट, जैताला वस्ती, शारदा नगर, साई ले आउट, झाडे ले आउट, जलविहार कॉलोनी आणि इतर परिसर..

जयताला जलकुंभ

संपूर्ण जयताला , रमाबाई आंबेडकर नगर, राधे श्याम नगर, ऑर्बिटल एम्पियर , दाते ले आउट, झाडे ले आउट, प्रज्ञा नगर, साई ले आउट, कबीर नगर, एकात्मता नगर आणि इतर भाग

त्रिमूर्ती नगर जलकुंभ

नासुप्र ले आउट, भामटी , प्रियदर्शनी नगर, साईनाथ नगर, लोकसेवा नगर, गुडधे ले आउट, इंगळे ले आउट, अमर-अशा ले आउट, नीता सोसाटी, इंद्रपृष्ठ नगर, फुलसुंगे ले आउट, परफेक्ट सोसायटी, वाघमारे ले आउट, भेंडे ले आउट, दुपारे ले आउट, पाटील ले आउट, पन्नास ले आउट, मनीष ले आउट, शहाणे ले आउट, प्रग्या सोसायटी, पॅराडाईस सोसायटी, ममता सोसाय टी, सोनेगाव, शिव विहार , इन्द्रप्रस्थ ले आउट, गजानन धाम, शिव नगर स्लम आणि सहकार नगर जलवाहिनी दुरुस्ती होईपर्यंत ह्या ब्रेकडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!