
करोना नियंत्रणासाठी सुप्रीम कोर्टाला विनंती, ‘दखल घ्यावी, देशाला वाचवा
देशान आता दररोज २ लाखांहून अधिक नवीन रुग्ण नोंदवले ( coronavirus india ) जात आहे. देशातील काही राज्यांमध्ये बेड, औषधं, ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. करोनाने देशातील स्थिती बिकट होत चालल्याने माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते अश्विनी कुमार ( ashwani kumar ) यांनी सुप्रीम कोर्टाला ( cji of india ) दखल घेण्याची मागणी केली आहे. अश्विनी कुमार यांनी सुप्रीम कोर्टाला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
गरीबांच्या जीविताला असलेला गंभीर धोका पाहता त्यांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची घटनात्मक जबाबदारी ही कोर्टाची आहे. कोर्टाने या प्रकरणी दखल घेऊन केंद्र आणि राज्यांमधील राजकीय सभा, आंदोलनं, धार्मिक आणि इतर उत्सवांमध्ये ५० हून अधिक नागरिकांची गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी अश्विनी कुमार यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
करोनावरील लसीच्या निर्यातीवर बंदी घालणं आणि प्रभावी लसींच्या आयातीला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना जिथेपर्यंत शक्य असेल त्यांना लस दिली जावी. विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि गरिबांना ही लस प्राधान्याने देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने जारी करावे, अशी मागणी माजी केंद्रीय कायदामंत्री अश्विनी कुमार यांनी केली