पश्चिम विदर्भ

कोविड निर्बंधाचे आदेश मागे :जिल्हाधिकारी अमोल येडगे 

यवतमाळ दि. 04 एप्रिल, (प्रतिनिधी) :

यवतमाळ जिल्ह्यातील कोविड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव स्थानिक परिस्थिती व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेवून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्राकररिता यापूर्वी कोविड-19 संदर्भाने लागू करण्यात आलेले निर्बंधाबाबतचे विविध आदेश राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेद्वारे 1 एप्रिल पासून एका आदेशान्वये मागे घेण्यात आले आहेत.

सर्व नागरिक, आस्थापना आणि संस्थां यांनी समाजाच्या आरोग्यासाठी कोविड या विषाणूचा प्रसार व फैलाव होवू नये याकरिता लसीकरण करून घ्यावे, तसेच मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे या पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!