
Breaking Newsमहाराष्ट्र
पंढरपूरातील यंदाची चैत्री यात्रा रद्द
पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्याने 23 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
यात्रा काळात देवावर होणारे सर्व नित्योपचार आणि परंपरा पाळल्या जाणार असल्या तरी मंदिरं 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने एकही भाविकाला चैत्री यात्रेला येत येणार नाही. यासाठी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून जगभरातील भाविकांना देवाचे 24 तास दर्शन घेता येणार आहे
चैत्री एकादशी दिवशी होणारी विठूरायाची पूजाही अधिकाऱ्यांच्याच हस्ते होणार असून कोरोनामुळे मंदिर समिती सदस्यांनाही पाचारण केले जाणार नाही . कोरोनाचे राज्य सरकारने घालून दिलेले नियमांचे काटेकोर पालन करीत एकादशीचा कोर्टानं सोहळा देखील मंदिर कर्मचारीच करणार आहेत