
कोरोना संकट किती काळ चालेल आणि किती मोठे रुप घेईल हे काहीच सांगता येत नाहीय! नितीन गडकरींचे वक्तव्य
राज्यासह देशभरात कोरोनाची मोठी लाट आली आहे. कोरोना लसीचा तुटवडा, रेमडेसीवीरचा तुटवड्याबरोबरच रुग्णांना आता हॉस्पिटल आणि बेडही अपुरे पडू लागले आहेत.या साऱ्या पार्शभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
नागपुरमध्ये आज राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (National Cancer Institute) १०० बेडच्या कोरोना हॉस्पिटलचे अनावरण केले. यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे घरेच्या घरे बाधित झाली आहेत. पुढे काय होईल हे सांगणे उचित नाही. हे कोरोना संकट किती काळ चालेल आणि किती मोठे रुप घेईल हे काहीच सांगता येत नाहीय. यामुळे या पुढच्या १५ दिवसांत किंवा महिनाभरात काय होईल हे सांगता येणार नाही. यामुळे चांगल्याचा विचार करणे आणि वाईटाचा मुकाबला करण्यासाठी तयारी करणे गरजेचे आहे. हॉस्पिटलनी युद्धपातळीवर काही काम केले तर पुढे मागे काही घडले, घडू नये. परंतू त्यासाठी तयार रहायला हवे, असे गडकरी म्हणाले.