
नागपूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले ‘नागपूर एम्स’च्या डायरेक्टरला व्यवस्था युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे निर्देश
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरात कोरोनाची परिस्थिति अत्यंत बिकट होत चालली आहे,दररोज 5 हजारच्या वर कोरोना संक्रमित आणि 60 च्या वर मृत्यु होत आहे,आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यावर उपाययोजनेसाठी पुढ़ाकर घेतला आहे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘नागपूर एम्स’च्या डायरेक्टर डॉ. विभा गुप्ता, डॉ. गिरीवार यांच्यासोबत बैठक करून एकूण कोविड परिस्थिती आणि इतर समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या
‘एम्स’मध्ये बेड्स वाढवणे, व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करणे, ऑक्सिजन पुरवठा वाढवणे आणि एचआरसीटी व्यवस्था युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे निर्देशही या वेळी गडकरीनी दिले.