
Breaking Newsमहाराष्ट्र
सावध व्हा; गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही बंद होणार
राज्यात लॉकडाऊन लागू करुनही बाजारपेठांमध्ये होणाऱ्या तुफान गर्दीमुळे आता राज्य सरकार अत्यावश्यक सेवाही बंदी करण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे बाजारपेठांमधील गर्दी कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.
अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा, त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.