पश्चिम विदर्भ

पीक कर्ज परतफेड 31 मार्च पुर्वी करून 6 टक्के व्याजसवलतीचा लाभ घ्या – जिल्हा उपनिबंधक 

यवतमाळ दि. 18 मार्च (प्रतिनिधी) :

सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभागाचे शासन निर्णय दिनांक ११ जुन,२०२१ अन्वये डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

आता या योजनेमध्ये व्याज दरात सवलत सुधारणेमुळे शेतकऱ्यांनी रुपये तीन लाख कर्जमर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहीत मुदतीत केल्यास सरसकट ६ टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र सरकार चे ३ टक्के व राज्य शासनाचे ३ टक्के असे अनुदान समाविष्ट आहे.

सदर लाभ ज्या शेतक-यांनी सन २०२१-२२ मध्ये पिक कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड विहीत मुदतीत दिनांक ३१ मार्च,२०२२ पुर्वी केली आहे. अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी त्यांचेकडील अल्पमुदती पिक कर्जाचा भरणा दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत करुन राज्य शासन व केंद्र शासनाकडील एकूण ६ टक्के व्याज दर सवलत याप्रमाणे एकुण व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याज दराने सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच पुढील सन २०२२-२३ च्या कर्जावरही व्याज सुट मिळेल.

ज्या शेतक-यांनी त्यांचेकडील पिक कर्जाची नियमित कर्ज परतफेड केली आहे. अशा नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत २०२२ चे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली आहे.

तथापि यासंबंधाने शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरच शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचेकडील पिक कर्जाची विहीत मुदतीत दिनांक ३१ मार्च, २०२२ पुर्वी परतफेड करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!