
हे सरकार पाडणारा जन्माला यायचाय!; फडणवीसांना अजित पवारांचा टोला
ज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय?, हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही’, अशा शब्दांत अजित पवार यांनी फडणवीस यांना आव्हान दिले.
आजवर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतक्या थेट शब्दांत कधी टीका केली नव्हती. मात्र, आजची राष्ट्रवादीची सभा ही फडणवीसांच्या सभेला उत्तर देणारी सभा ठरली. या सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार या सर्वांच्याच भाषणाचा रोख हा फडणवीस यां ना त्या वक्तव्यकाडे होता
फडणवीस यांनी सभेत अजित पवार यांची नक्कल केली होती. त्यावरूनही अजित पवार भडकले. आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही आणि केलाच तर… असे म्हणत सूचक इशाराच अजित पवार यांनी दिला. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पावसात भिजण्यावर केलेल्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला. तुम्ही कोठे आणि साहेब कोठे असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीस यांना टोला हाणला. चंद्रकांत पाटील यांनाही अजित पवार यांनी लक्ष्य केले. ‘चंपा’ असा पुन्हा एकदा उल्लेख करत ‘ते उद्या येथे येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका’, असे अजित पवार म्हणाले.
मंगळवेढ्यातील सभेत ‘अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते. हे महावसुली सरकार आहे. या सरकारचा अन्याय, दूराचार आणि भ्रष्टाचार रोखण्याची व हे सरकार चालवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील नागरिकांना मिळाली आहे, ती दवडू नका, असेही फडणवीस म्हणाले होते. त्याचा अजित पवार यांनी समाचार घेतला.
Mybhumi news #ajitpawar #devendrafadanvis