
आशा स्वयंसेविका सविता कुकडे यांच्या मृत्यूची चौकशी करा
नागपूर मधील भरतवाडा यू.पी.एच.सी. मधील आशा वर्कर सविता कुकडे यांचा कोरोना प्रादुर्भावामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करून ५० लाख रू. त्यांचे परिवाराला विम्याची रक्कम देण्यात यावी. सविता हिचे पती हातमजुरी करीत असून १२ वर्षाचा मुलगा व ८ वर्षाची मुलगी शिक्षण घेत आहे. आर्थिक स्थिती हलाखीची आहे. पूर्ण वेळ कोरोना रुग्णाची सेवा करतांना स्वतः बाधीत झाली. परंतु बिकट परिस्थिती निर्माण झालेले वातावरण त्यामुळे योग्य उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे तिला मृत्यूचा सामना करावा लागला.
कोरोना काळात १ वर्षापासून आशा वर्कर व गटप्रवर्तक आपल्या जीवाचे रान करून नागरिकांना सेवा देत आहेत. परंतु शासनामार्फत त्यांचेवर दुर्लक्ष केल्या जात आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना किमान समान वेतन लागू करावे. तसेच कोरोना काळातील कामाचा मोबदला योग्य मोबदला द्यावा. अशी मागणी आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सी.आय.टी.यू) चे अध्यक्ष -राजेंद्र साठे यांनी केली.
कोरोना योद्ध्याना शासनाने ५० लाख रू. विम्याचे कवच दिले असून सदर रक्कम सविता कुकडे यांच्या परिवाराला त्वरित देण्यात यावी. आशा किंवा परिवारातील सदस्य बाधीत झाल्यास त्यांना त्वरित बेड उपलब्ध करून योग्य उपचार करावा. आशा वर्कर यांना सॅनिटायजर, हॅन्ड क्लोज, मास्क पुरेसे उपलब्ध करावा. अशी मागणी सीटू तर्फे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद CEO यांना करण्यात आली.👆