ग्रामीण

संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

हिंगणा दिनांक 7 मार्च (प्रतिनिधी)

महिला दिनाचे औचित्य साधून संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतर्फे हिंगणा तालुक्यातील प्रशासकीय पदावर कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग होते तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर ग्रामीण च्या विभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, हिंगण्याच्या तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, वानाडोंगरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे,नागपुर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्य रश्मीताई कोटगुले, संस्थेचे संचालक महेश बंग, संस्थेच्या संचालिका अरुण बंग आदी उपस्थित होते

यावेळी कर्तुत्ववान महिला प्रशासकीय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, नगर परिषद वानाडोंगरीच्या मुख्य अधिकारी अर्चना मेंढे, प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा सेलूकर, ग्रामीण रुग्णालय हिंगणाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता गजभिये, पंचायत समिती हिंगणा येथील पशुधन विस्तार अधिकारी डॉ. ऋचा लांजेवार, हिंगणा पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक अमृता सोमवंशी, जिल्हा परिषदेच्या सदस्या रश्मी कोटगुले, हिंगणा येथील प्रसिद्ध महिला युट्युबर संजीवनी निनावे यांचा आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्या करिता महिलादिनी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका अरुणा महेश बंग यांनी केले. सूत्रसंचालन आनंद महल्ले यांनी तर आभार दिनकर लखमापूरे यांनी मानले

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता स्व. देवकीबाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य नितीन तुपेकर, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, सूर्यकांत दलाल, प्रा.सीमा जोशी, प्रा.कैलास पांडे प्रा निशिकांत पोकळे, राजू लांडे, अमोल हिरडकर, नितीन लोहोकरे, प्रशांत चव्हाण, श्वेता तुपेकर, अर्चना चेंडके, शालिनी सारावत, देवयानी अनमोलवार, अनुश्री काशेट्टीवार आधी शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!