नागपूर

अतिरिक्त बेड्ससाठी आवेदन करणाऱ्या रुग्णालयांना २४ तासांत परवानगी द्या :नितीन गडकरी

नागपूरमधील कोविड रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कोरोना वॉर रूममध्ये महापौर, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, ड्रग्स डिलर असोसिएशन तसेच सामाजिक आणि वैद्यकीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी अतिरिक्त बेड्ससाठी आवेदन करणाऱ्या रुग्णालयांना २४ तासांत परवानगी देण्याचे निर्देश या वेळी गडकरींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टॅंकर्सची संख्या वाढवण्यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला असून याबाबत अनेक खाजगी कंपन्यांशी बोलणे करून अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा मागवण्यात आला आहे.

नागपूरला ऑक्सिजनची कमी पडू देणार नाही, अशी हमी गडकरींनी दिली असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले आहे. इंजेक्शन आणि औषधांची कमतरता भासू नये यासाठी ‘पेटंट एक्ट’मधील सेक्शन ८४ शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरींनी पत्र पाठवले असून इंजेक्शन आणि औषधांचे वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठीच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!