पूर्व विदर्भ

महाशिवरात्री निमित्त दर्शनाला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात,तीन युवकांचा जागीच मृत्यू

वर्धा दिनांक 28 फरवरी( प्रतिनिधी)

महाशिवरात्रीनिमित्त वर्धा येथील आष्टीमधील पचमडी येथून देवदर्शनाला मध्य प्रदेशात निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये वर्ध्यातील दोन तर अमरावतीमधील एका भाविकाचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामध्ये सुदैवाने एकजण बचावला आहे. ही घटना आज (२८ फेब्रुवारी २०२२ रोजी) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेने गावात शोककळा पसरली. तुषार झामडे यांच्या कारने भिंतीला धडक दिल्याने अपघातात गाडीच्या समोरील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.

वर्ध्यातील आष्टी येथून काल सायंकाळी चार मित्र मध्य प्रदेशातील पचमडी येथे भोलेनाथांच्या देवदर्शनाला निघाले. पचमडी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. दरवर्षी विदर्भातील शिवभक्त मोठ्या प्रमाणात भगवान शंकराच्या दर्शनासाठी या जत्रेला जात असतात.

नागपूर, अमरावती, वर्धा यासह इतर जिल्ह्यातील भाविक या जत्रेला जातात. याच भक्तांप्रमाणे काल अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गौरखेडे आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तुषार झामडे व दीपक भाऊराव डाखोरे व अन्य एकजण जत्रेला जाण्यासाठी तुषारच्या गाडीमधून निघाले होते.

मात्र या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये अक्षय, तुषार आणि दीपक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातून एकजण बचावला असून त्यांचे नाव अद्यापपर्यंत कळू शकले नाही.

मध्यप्रदेश मधील पचमडी येथे जाताना मोरका गावाजवळ रस्त्याच्या वळणावर चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटल्याने वळणावरील भिंतीला गाडीने जबर धडक दिली. या धडकेत कार चारवेळा पलटल्यानंतर थांबली. अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन जण जागीच ठार झाले. या घटनेने आष्टी व तीवस्यात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!