महाराष्ट्र

अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र दिनांक 27 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडे पक्षाने एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे (MNS appoints Amit Thackeray as President of Maharashtra Vidyarthi Sena) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

येत्या काळात मुंबईसह राज्यातील इतरही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांपूर्वी मनसेने अमित ठाकरे यांच्याकडे दिलेली ही जबाबदारी खूप महत्त्वाची मानली जात आहे.

आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद हे रिक्त होते. त्यामुळे या पदावर अमित ठाकरेंचीच नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी होत होती. अखेर आज मराठी भाषा दिनाच्या औचित्याने मनसेने अमित ठाकरे यांची या पदावर नियुक्ती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!