महाराष्ट्र

जर आपल्याला मृत्यू टाळायचे असतील, तर लॉकडाउन गरजेचं :नाना पाटेकर

कोणत्याही सरकारला लॉकडाऊनचा (Maharashtr Lockown) निर्णय घेताना आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे असतील, तर हे गरजेचं आहे, असे नाना पाटेकर यांनी म्हटले. (Bollywood actor Nana Patekar on Lockdown in Maharashtra) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर मतमतांतरे असताना अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपले मत व्यक्त केले आहेे

नाना पाटेकर यांना राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाचे समर्थन केले. राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असून प्रत्येकाने या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सरकार कुठपर्यंत मदत करणार?

राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यास हातावर पोट असलेले मजूर आणि व्यापाऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर झाले पाहिजे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. याविषयी नाना पाटकेर यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी म्हटले की, सरकार कुठपर्यंत मदत करणार? सरकारला एक मर्यादा आहेत. ते त्यांच्या परीने मदत करतच राहणार आहेत. पण आपण मी, तू सर्वांनी काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एकाने 100 लोकांची नव्हे, तर एक-दोन अशा लोकांची जबाबदारी घेण्यासाठी या कठीण काळात पुढं आलं पाहिजे. आपण स्वतःला नशीबवान समजले पाहिजे की, अशा कठीण काळात कोणासाठी तरी काही करू शकतो, असे नाना पाटकेर यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!