पूर्व विदर्भ

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरणात वर्धा जिल्हा राज्यात चौथा

 वर्धा, दि.26 फेब्रुवारी (प्रतिनिधी) :

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्हा क्षयरोग केंद्राने क्षयरोग निर्मुलनाचे उत्कृष्ठ काम करुन राज्यात चौथा क्रमांक पटकाविला आहे. उत्कृष्ट कामासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांच्याहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग निर्मुलनासाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय प्रबोधिनी येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमात उत्कृष्ठ कामगिरी करणा-या क्षयरोग केंद्रांना आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करुन गौरविण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, आरोग्य सेवेच्या संचालक डॉ.अर्चना पाटील, आरोग्य सेवा सहसंचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) डॉ. रामजी आडकेकर, आरोग्य संघटनेचे राष्ट्रीय अधिकारी डॉ. किरण राडे, युनियनचे डॉ. सचदेवा यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.पराडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदपाठक व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सिमा मानकर यांच्या मार्गदर्शनात धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. जिल्हयामध्ये आपसात चांगला समन्वय असल्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील टिमवर्कला चांगले यश आले आहे.

जिल्हयातील सर्व क्षयरुग्णांना कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणा-या सर्व सुविधा वेळेत व मोफत देण्यात येते. खाजगी क्षेत्रातील क्षयरुग्णांना विशेष सोय देण्यात येत असून त्यांचे सिबिनट करीता प्राधान्य देण्यात येते.

मागील वर्षी कोविडच्या दुस-या लाटेचा परिणाम असतांनाही जिल्हयात 1 हजार 535 नविन क्षयरुग्णांना उपचाराखाली आणण्यात यश आले. यासाठी खाजगी क्षेत्रातील 289 रुग्ण शोधण्याकरीता खाजगी वैद्यकीय व्यावसाईकांनी मोलाचे सहकार्य केले. क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत संशयित क्षयरुग्णांची मोफत तपासणी व उपचार, कुटूंबातील इतर सदस्याची तपासणी, निक्शय पोषण योजनेअंतर्गत आहारासाठी अनुदान इत्यादी बाबी करण्यात आल्या आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!