
नागपूर
नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत गड़करींची बैठक, गती वाढवण्याचे निर्देश
नागपूरच्या नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत , जलशक्ती मंत्रालयाचे सचिव पंकज कुमार जी, नागपूर महानगरपालिका आयुक्त बी. राधाकृष्णन आणि ‘जायका’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
याबाबत तातडीने कन्सल्टंट नियुक्त करून सुधारित डीपीआर तयार करण्याचे आणि कामाची गती वाढवण्याचे निर्देश या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी दिले.