
गर्भवती युवतीची सुपारी देवून हत्या,जन्मदात्री आईच निघाली…..
पतीपासून वेगळी राहत असलेली मुलगी गर्भवती राहिली. यामुळे बदनामी होईल या भीतीने जन्मदात्या आईनेच मुलीच्या खुनाची सुपारी दिली.
मृत सैदा बदावत ही मुळची तेलंगणा राज्यातील कोंडापल्ली विजयवाडा येथील रहिवासी हाेती. तिचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला ९ वर्षांची मुलगी आहे. मागील काही वर्ष ती पतीपासून विभक्त राहत होती. आई-वडीलांबराेबरही तिचा नेहमी वाद हाेत असे. तिनेच आपल्या वडिलांना झाेपेच्या गाेळ्या देवून खून केल्याचा संशय,लचमी हिला हाेता. सैदा ही गर्भवती राहिली. यामुळे समाजात आपली बदनामी होईल या भीतीने सैदाला खून करण्याचा कट तिच्या आईने रचला. तिने यासाठी नातेवाईक असलेल्या सिन्नू अजमेरा व शादरा अजमेरा या दाम्पत्याला ३० हजार रुपयांची सुपारीही दिली.
सैदा आणि लचमी या दाेघी खंमम ( तेलंगणा ) येथे १४ फेब्रुवारी राेजी एका लग्नासाठी आल्या होत्या. या लग्नाला सिन्नू व त्याची पत्नी शारदाही आले हाेते. येथेच सैदाला संपविण्याचा कट रचण्यात आला. यासाठी दाम्पत्या लचमीने ५ हजार रूपये दिले. आपल्या गावात गर्भपात करण्यासाठी औषधी मिळत असल्याचे भासवून सिन्नू हा सैदाला घेवून विरूर परिसरातील मुंडीगेट येथे आला. येथील विहिरीत तिला ढकलेले, मागून दगड फेकला.
विरूर पोलिसांनी मोठ्या कार्यकुशलतेने दोन दिवसात खुनाचा उलगडा केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या
ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrpur Murder) विरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उघडकीस आली आहे. सैदा बदावत असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आई लचमीसह सिन्नू अजमेरा व शादरा अजमेरा या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या तिघांनी सैदा बदावत हिने आत्महत्या केल्याचा बनाव केला हाेता;
पण विरूर पाेलिसांनी अवघ्या ४८ तासांमध्ये सखाेल तपास करत या गुन्ह्याचा छडा लावला.