
भीषण कार अपघातात पती, पत्नी आणि पाच महिन्याचा बाळ ठार
नागपूर दिनांक 19 फरवरी (प्रतिनीधी)
भीषण कार अपघातात पती, पत्नी आणि पाच महिन्याचा चिमुकला ठार झाला आहे. ही घटना कोंढाळी-नागपूर मार्गावर शिवा फाट्या नजीक घडली. रोशन तागडे (वय 28), आचल तागडे (वय 23) राम तागडे (5 महिने) अशी मृतकांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन तागडे हे आपल्या कुटुंबासह कोंढाळी येथे लग्नाला गेले होते. लग्न सोहळा आटोपून नागपूरला परत येत होते. अमरावती-नागपूर महामार्गावर शिवा फाट्याजवळ पोहोचले असता अचानक समोर असलेला ट्रेलर थांबविण्यासाठी डावीकडे वळवला. त्यामुळे भरधाव कारने ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला.
जोरदार धडकेमुळे कार चालवत असणारे रोशन तागडे आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा रामचा जागेवरच मृत्यू झाला. पत्नी आचल तागडे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आई, बाप-लेकांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.