नागपूर

अंत्योदय योजनेतंर्गत साखर वितरणासाठी उपलब्ध

नागपूर दि. 28 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत लाभार्थ्यांना साखर वितरीत करण्यासाठी साखरेची खरेदी ई-लिलाव एनसीडीईएक्स ई-मार्केटस लि. मार्फत 15 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या ई निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नागपूर ग्रामीण साठी 1995 क्विंटल साखर नियतन माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तिमाहीसाठी प्राप्त झाले आहे

तालुकानिहाय रास्त भाव दुकानामार्फत फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कुटूंब 1 किलो विक्री दर 20 रुपये किलो प्रमाणे वितरण करण्यात येणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!