
सावंगी रुग्णलयातील डॉक्टर ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात,तब्बल 3 लाख….
वर्धा दिनांक 18 फेब्रुवारी (प्रतिनिधी)
सावंगी रुग्णलयातील एका डॉक्टरला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात खेचून ब्लॅकमेल करत तब्बल ३ लाख २५ हजार ५४० रुपयांनी गंडा घातल्याची घटना घडली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरची फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीची ओळख झाली. दोघांत मैत्री झाल्यानंतर तरुणी डॉक्टर युवकाला व्हिडीओ कॉल करुन बोलू लागली.
दरम्यान, तरुणीने डॉक्टर युवकाचा आणि स्वत:चा विवस्त्र व्हिडीओ क्लिप तयार करून डॉक्टर युवकाच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर पाठविला आणि ती व्हिडीओ क्लिप डिटील करण्यासाठी पैशाची मागणी केली.
बदनामी होण्याच्या भीतीने डॉक्टर युवकाने फोन पे आणि गुगल पे च्या माध्यमातून अज्ञात तरुणीच्या खात्यावर पहिले ६० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, तरुणी ऐवढ्यावरच थांबली नाही तर पुन्हा पैशाची मागणी करुन ब्लॅकमेल करु लागली. अखेर डॉक्टर युवकाने पुन्हा २ लाख ६५ हजार ५४० रुपयांची रक्कम पाठविली असे एकूण ३ लाख २५ हजार ५४० रुपयांनी डॉक्टर युवकास गंडविले.
या प्रकरणाची डॉक्टरने सावंगी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.दिल्ली, हैदराबाद, गाझियाबाद, राजस्थान, नोएड ही ‘सेक्सटॉर्शन’ च्या टोळींची प्रमुख केंद्र असल्याची माहिती असून येथूनच अश्या प्रकारे ब्लकमेलिंग केल्या जातं आहे.त्यामुळे अशा कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी फेसबुकवर मैत्री महागात पडू शकते हे तितकेच खरे.