
कोव्हिड बेडस ची माहिती आता एका क्लिकवर
नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने सॉफ्टवेयर जनतेच्या सेवेत
नागपूर शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. कोरोना बाधितांचा वाढता प्रभाव लक्षात घेता शहरातील विविध खाजगी व शासकीय रुग्णालय मिळून बाधितांसाठी किती बेडस उपलब्ध आहे याची माहिती देण्यासाठी नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड च्या वतीने सॉफ्टवेयर तयार केला आहे.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर उपलब्ध आई.सी.यू. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. या सोयीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी व्यक्त केला.
नागपूर स्मार्ट सिटी च्या ई-गर्व्हनेंस विभागाने कोव्हिड बेड ची उपलब्धता दाखविणारा साफ्टवेयर तयार केला आहे. नागपूरात सध्यास्थितीत १०७ रुग्णालयांमध्ये बेडसची उपलब्धता दर्शविली जात आहे. ऑक्सीजन बेड, आई.सी.यू. बेड, व्हेंटीलेटर बेडस चा तक्ता दर्शविणारा हा सॉफ्टवेयर नागरिकांना त्यांचे निकटवर्तीयांसाठी मोठा आधार ठरेल.
रुग्णालयांना सॉफ्टवेयरचे लॉगिन आई डी देण्यात आले आहे. रुग्णालयाचे ऑपरेटरला नवीन पेशंट आला किंवा बेड रिकामा झाला याची माहिती या साफ्टवेयरवर अपडेट करायची आहे. ही माहिती नागरिकांसाठी डॅशबोर्ड वर रीयल टाईम दाखविली जाईल. संबंधीत व्यक्ती आपल्या गरजेनुसार रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांना दाखल करु शकतो.
मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी सांगितले की नागपूर महानगरपालिका www.nmcnagpur.gov.in व नागपूर स्मार्ट सिटी च्या संकेत स्थळ http://nsscdcl.org/covidbeds वर क्लिक करुन माहिती घेता येईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.