
महाराष्ट्रात बर्ड फ्लू ची एन्ट्री, पक्ष्यांचा मृत्यू
महाराष्ट्र दिनांक 17 फरवरी ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र सरकारने गुरुवारी राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी केली आहे.
ठाण्यातील एका पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचा एव्हीयन इन्फ्लूएंझा A(H5N1) विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. परंतु प्रशासनाने लोकांना घाबरू न जाण्याचे आवाहन केले आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेल्हेवली येथील फार्ममध्ये सुमारे २०० कुक्कुटपालन केलेले पक्षी आहेत.
2, 5 आणि 10 फेब्रुवारी रोजी काही पक्षी मरण पावले, तेव्हा फार्मने सुरुवातीला मृत्यूची नोंद केली नाही. 10 फेब्रुवारी रोजी मृत्यूची नोंद झाल्यानंतर, 11 आणि 13 फेब्रुवारी रोजी नमुने गोळा करण्यात आले आणि पुण्यातील पशुसंवर्धन विभागाच्या रोग तपासणी विभागात त्याचे मूल्यांकन करण्यात आले. हे नमुने भोपाळ येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय-सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेसलाही पाठवण्यात आले आहेत.
सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ‘आम्हाला काल रात्री पक्ष्यांना एव्हियन इन्फ्लूएंझाची लागण झाल्याची पुष्टी झाली. संबंधीत गावाच्या ठिकाणी स्थलांतरीत पक्षी येतील असा कोणताच तलाव नाही. परंतु आम्ही विभागाला सुचना दिल्या आहेत की हा व्हायरस आला कुठुन याचा शोध घ्या. तज्ञ अधिकाऱ्यांची टीम चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. त्यामुळे घाबराण्याचे कारण नाही. पक्ष्यांच्या असामान्य मृत्यूचा नोंद करण्यासाठी आमचे अधिकारी सतर्क असल्याचे सिगं यांनी सांगितले.
सिंह म्हणाले की, शेताच्या एक किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या आणि 23,800 पक्षी मोजले गेले. ‘प्रोटोकॉलनुसार मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सॅनिटायझेशनचे उपायही सुरू आहेत. ‘त्या झोनमधून कोणीही बाहेर जाऊ नये म्हणून सर्व हालचाली थांबवण्यात आल्या आहेत.