
महाराष्ट्र
सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे :बच्चू कडू
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जाताहेत. त्यामुळे पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक केंद्राने तीन महिने पुढे ढकलली असती तर आभाळ कोसळलं नसतं. सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे, असा आरोप करत बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला.
राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि काही ठिकाणी प्रशासकही नेमले आहेत. मात्र केंद्र सरकारने हा विचार न करता पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू हे आज सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी सोलापूर शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.