
सरकारमध्ये दुरुस्तीची वेळ,10 मार्च नंतर सरकारमध्ये बदल करणार : नाना पटोले
महाराष्ट्र दिनांक 16 फरवरी (प्रतिनिधी )
सध्याच्या सरकारमध्ये जे काही सुरू आहे, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची वेळ आली असून 10 मार्चनंतर हे काम करणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये अनेकांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे.
पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे 10 मार्चनंतर सरकारमध्ये बदल पाहायला मिळतील असे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले. त्यामुळे नाना पटोले 10 मार्चनंतर नेमकी कोणती पावले उचलणार आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.