
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कत्त्लखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद
नागपूर 15 फेब्रुवारी (प्रतिनिधी)
“श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती” (तारखेनुसार) दिनानिमित्त शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी, २०२२ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्र.२४० दिनांक ०२/०७/२०१८ अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक ०३/०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.
त्यानुसार शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला “श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती” (तारखेनुसार) दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हददीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.
जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन यांनी दिली आहे.