ग्रामीण

व्हॅलेंटाईन डे :महीला बोलत नाही म्हणून चाकूने वार नंतर मुलासमोर केली……

नागपूर 15 फेब्रुवारी ( प्रतिनिधी)

महीलेवर चाकूने वार करून पुरुषाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही थरारक घटना भिवापूर परिसरात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी उघडकीस आली. या घटनेने पोलिस व रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. चरण (वय ५५), असे मृताचे; तर स्वर्णिमा (वय ३७, दोघांचीही नावे बदललेली), असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण हा शेती करीत असून तो स्वर्णिमावर एकतर्फी प्रेम करायचा. काही दिवसांपूर्वी स्वर्णिमाला संशय आल्याने तिने चरणसोबत बोलणे बंद केले. त्यामुळे चरण संतापला. रविवारी दुपारी आरी आणण्याच्या बहाण्याने चरण हा स्वर्णिमाच्या घरी गेला. त्याने तिला आरी मागितली. स्वर्णिमा ही आरी आणण्यासाठी खोलीत गेली असता चरणही तिच्या मागे गेला. त्याने तिच्या पोटावर तसेच मानेवर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. ‘मला का मारत आहे’, अशी विचारणा स्वर्णिमाने केली. त्यावर ‘तू माझ्याशी बोलत नाही, तुला जिवानिशी ठार मारल्याशिवाय सोडणार नाही’, असे म्हणत त्याने पुन्हा तिच्यावर चाकूने वार केले. स्वर्णिमाने आरडा-ओरड करताच चरण तेथून पळून गेला. शेजाऱ्यांनी धाव घेतली. जखमीला जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भिवापूरचे ठाणेदार महेश भोरटेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

अन् मुलासमोरच घेतले विष!

स्वर्णिमावर वार करून चरण पसार झाला. पोलिसांसह त्याच्या मुलाने चरणचा शोध सुरू केला. सोमवारी सकाळी चरण हा अड्याळ परिसरातील शेतात असल्याची माहिती मुलाला मिळाली. मुलगा व त्याचे दोन मित्र तेथे गेले. मुलाला बघताच चरण पळायला लागला. ‘बाबा पळू नका, थांबा’, असे मुलगा म्हणाला. मुलगा त्याच्याजवळ गेला. यावेळी चरणच्या हातात विषाची बाटली होती. ‘बाबा तुम्ही हे काय केले’, असे मुलगा चरणला म्हणाला. ‘मी चुकीचे कृत्य केले. माझी बदनामी झाली, माझी मुलगी मला माफ करणार नाही’ असे म्हणत चरणने बाटलीचे झाकण उघडून विष प्राशन केले. मुलाने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून चरणला मृत घोषित केले. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!