
ग्रामीण
महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुनील केदार यांनी घेतली कोरोना लस
महाराष्ट्रातील दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे कोरोना लस घेतली
कोरोना या रोगाला आळा घालण्याकरिता ही लस उपयुक्त आहे असे त्यानी यावेली सांगीतले तसेच आपण सर्वांनी या लसीकरण मोहिमेचा आपली देशाप्रती जबाबदारी म्हणून व्यापक प्रचार व प्रसार करावा असे आवाहनही जनतेला त्यांनी केले
यापूर्वी सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यावेली त्यांनी कोरोनावर मात केली होती