
महाराष्ट्र
शिवसेनेच्या महिला नगरसेविका कल्पना पांडे यांचा करोनामुळं मृत्यू
नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे करोनामुळं निधन झाले आहे
कल्पना पांडे यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णलयात उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कल्पना यांच्या निधनानं महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या प्रभाग २४ मध्ये विद्यमान नगरसेविका म्हणून त्या काम पाहत होत्या. त्या नाशिक महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडुन आल्या होत्या