
राज ठाकरे लीलावती रुग्णलयात दाखल
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
राज ठाकरे यांच्यावर कमरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया होत आहे, त्यासाठी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळेच आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत.
या सुरु असलेल्या या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाहीत
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.