पूर्व विदर्भ

आर्वी: 13 वर्षीय मुलीच्या गर्भपात प्रकरणी गृहमंत्र्यांना नीलम गोऱ्हे यांचे निवेदन

दि. १४ जानेवारी  वर्धा/नागपूर/पुणे /मुंबई

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना अटक केली. यामध्ये अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून अटक केलेल्या आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. रेखा कदम असे त्यांचे नाव आहे.

त्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना.डॅा.नीलम गोऱ्हे यांनी घटनेची शहानिशा करून आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांना पत्राद्वारे घटनेबद्दल माहिती दिली.

वर्धा जिल्ह्यात येथे आर्वी येथील एका अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर रित्या गर्भपात केला. मिळालेल्या माहितीनुसार आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत संबंध होते. या प्रकरणात दि. ९ जानेवारी २०२२ रोजी आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून FIR क्रमांक २५/२०२१ असून त्यामध्ये कलम ३७६(३),३७६(२), (एन), ३१२, ३१३,३१५,३४१,२०१,५०६,३४, भादवी सहकलम ४,६,२१ (१) पोस्को या प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. यावरून पोलिसांनी रात्रीच गुन्हा नोंद केला होता. तसेच आवश्यक परवानगी घेऊन लगेच कारवाई करण्याच्या हालचाली केल्या मात्र रात्री घर व दवाखाना बंद असल्यामुळे पोलिसांना तात्काळ कारवाई करता आली नाही.

मात्र दि१०/०१/२०२२ रोजी डॉ रेखा कदम यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनवणे व त्यांचे पथकाने अटक केली. पास्को सेलच्या उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांच्यासह पोलीस स्वत:हून घटनेचा तपास करत आहेत.त्या सभोलताच्या परिसराचा तपास करत असताना दि.१२ जानेवारी २०२२ रोजी कदम हॉस्पिटल च्या मागे गॅस चेंबर आहे. त्याच चेंबर मध्ये एक अर्भक व काही मासांची गोळे व हाडांचा चुरा सापडला. त्यामुळे सापडलेले अर्भक हे याच गर्भपात केलेल्या मुलीचा असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकरणात पास्को अंतर्गत व बेकायदेशीर गर्भपात व गर्भपात कायद्या नुसार इतर परवानगी न घेता अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी पंचनामामध्ये सापडलेल्या अर्भक व मासाची गोळे ही CA ऑफिस आरोग्य विभाग नागपूर येथे टेस्टिंग करिता पाठवण्यात येणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात डॉ.रेखा कदम सह तिघांना अटक करण्यात आली असे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांच्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे. सदरील घटनेबाबत नीलमताई गोर्हेंनी मागण्या केल्या आहेत .

*मागण्या *

१. सदरील प्रकरणाच्या घटनेतील निकाल लवकारात-लवकर योग्य दृष्टिने लागावा यासाठी मदत करणारे त्यांचे साथीदार यांचा शोध घेऊन त्यांच्यावर आवश्यक कलमे लावण्यात यावीत. तसेच त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.

२. कायदेशीर गर्भपात करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यात अस्तित्वात आहे. सदर समितीची बैठक प्रत्यक्ष किंवा दुरदृष्टी प्रणाली मार्फत नियमीत होणे गरजेचे आहे.

३. महानगर/नगरपालिका/नगरपरिषद/पंचायत अखत्यारीत येणारे सर्व खाजगी रूग्णालयातील “जैव वैद्यकीय कचरा” किती उपलब्ध होतो, किती प्रमाणात गोळा केला जाते याबाबतचा तपशील अहवाल सर्व हॉस्पिटल यांनी महानगर पालिका/नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील संबंधीत अधिकाऱ्यांना घ्यावा.

४). पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून तात्काळ मदत मिळवून देण्यात यावी.

यासाठी प्रत पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी गृहराज्यमंत्री ना. शंभुराजे देसाई , डॉ प्रदीप व्यास, अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य,  संजय पांडे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!