
महाराष्ट्र
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar)यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते 63 वर्षांचे होते.
काही दिवसांपूर्वीच रावसाहेब अंतारपूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. (Congress MLA Raosaheb Antapurkar no more)
25 दिवसांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यावर नांदेडच्या भगवती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 12 दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होतेे,आज अखेर त्यांची प्राणज्योत मावलली