
महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (09 एप्रिल) वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत
वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील काय बंद राहणार ?
अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.
वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार?
सुपरमार्केट, डी-मार्ट, बिग बाझार, रिलायन्स उघडे राहणार का ?
कोणतही ठिकाण जे अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते 4 आणि 5 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरु राहणार आहे. जर ते विविध वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत त्या विकत असतील तर ते बंद राहतील.
गॅरेज सर्विस,ट्रानस्पोर्ट वाहन दुरुस्ती सेवा सुरु राहणार? वाहनांचे स्पेअर पार्ट पुरवणारी दुकानं सुरु राहणार?
गॅरेज सुरु राहतील, स्थानिक प्रशासनानं तिथे कोरोना नियमांचं पालन केलं जातेय का ते पाहावे. ऑटो पार्ट पुरवणारी दुकानं बंद राहतील.
सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु असतील. रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरु असतील.