पश्चिम विदर्भ

यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांनी पाठवले पत्र, लिहिले……

यवतमाळ दिनांक 24 दिसंबर (प्रतिनिधि)

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, एडवोकेट राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पाठवले होते. ढोरे यांनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशीर्वाददेखील दिले आहेत.

ढोरे यांच्या पत्राला उत्तर देताना मोदींनी ढोरे कुटुंबाचे निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले आणि वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले आहेत. ढोरे कुटुंबियांना हे पत्र २२ डिसेंबर रोजी मिळाले असून तेव्हापासून त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून ढोरे कुटुंबाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

एका छोट्याश्या गावातील एका तरुणाने आपल्या लग्नाची पत्रिका देशाच्या सर्वोच व्यक्तीला पाठवली आणि त्यांनी प्रतिसाद दिल्याने गावामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठविल्याने ढोरे परिवारातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या आहेत पत्रामध्ये पीएम मोदींच्या शुभेच्छा

राहुल आणि मयुरी तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. नवजीवनात तुम्हाला सुखी आणि समृद्ध जीवनासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा असे त्यात मोदींनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!