नागपूर

रेशीमबाग मैदान येथे भिमाकोरेगाव शौर्यदिन समारोहाची परवानगी पोलिस प्रशासनाने नाकारली

नागपूर दिनांक 23 डिसेंबर ( शहर प्रतिनिधी)

“शौर्यदिन अभिवादन आयोजन समिती नागपूर” यांच्या माध्यमातून नागपुरातील विविध आंबेडकरी संघटना यांच्या सयुंक्तिक सहभागाने १ जानेवारी २०२२ रोजी रेशीमबाग मैदान, नागपूर येथे प्रबोधन आणि भिम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे ठरविले असता या संबंधित संपूर्ण परवानगीचे प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. ज्या मध्ये सी.पी.एंड बेरार कॉलेज तसेच हनुमान नगर झोन मधील आरोग्य विभाग त्या मध्ये प्रमुख्याने नागपूर सुधार प्रान्यास या विभागाने सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र शौर्य अभिवादन आयोजन समितीला दिलेली आहे.

त्यानंतर दिनांक २२ डिसेंम्बर २०२१ रोजी रेशीमबाग मैदान यांच्या हद्दीतील कोतवाली पोलीस स्टेशन तसेच नागपूर शहराचे पोलिस विशेष शाखा विभाग यांना शौर्यदिन आयोजन समितिने लिखित स्वरूपात परवानगी मागितलेली असता पोलीस विभागाने लगेच २४ तासात ही परवानगी नाकारली व आयोजन समितीला सांगितले की कार्यक्रम रेशीमबाग मैदानात घेऊ नये तसेच पोलिस प्रशासनाने कारण दिले की संबंधीत मैदानाला लागून मर्म स्थळ आहे असे विशेष शाखा नागपूर पोलिस विभाग यांच्या द्वारे लिखित स्वरूपात देण्यात आले. तसेच त्यांनी या पत्रा मध्ये परवानगी नाकारण्यात आली.

या अगोदर सुद्धा फरवरी २०२० मध्ये पोलीस विभागाने रेशीमबाग मैदानात कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारलेली होती, मात्र त्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागण्यात आलेली असता उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली होती, म्हणून याच निर्णयाची दखल घेऊन शौर्यदिन आयोजन समीती या वेळेसही  नागपुर खंडपिठाकडे दाद मागणार आहे.

या सर्व प्रकरणात हे लक्ष्यात येते की नागपूर पोलीस विभाग हा आमच्या संवैधानिक अधिकाराचे हणन करीत आहे. संविधानाच्या अनुच्छेद १९ मध्ये दिलेल्या अधिकाराचा अवमाण करत आहे मात्र संविधानाच्या मुलभूत अधिकारांचे हनन होऊ नये यासाठी आम्ही तत्पर असल्याचे भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्याचे संस्थापक प्रफुल्ल शेंडे यांनी सांगितले तसेच आमच्या संवैधानिक अधिकारासाठी आम्ही न्यायालयाच्या माध्यमातुन न्याय घेऊनच राहू यासाठी शौर्यदिन अभिवादन आयोजन समिती तसेच प्रफुल  शेंडे यांच्या माध्यामातून  उच्च न्यायालया मध्ये याचिका दाखल करण्यात येईल व उच्च न्यायालयामध्ये अधिवक्ता म्हणून सोनिया गजभिये भीमराज कि बेटी फौंडेशन च्या अध्यक्षा या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयात बाजू मांडणार आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!