
महाराष्ट्र
देशात कोरोनाचा नवा स्ट्रेन,लक्षणं आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्या.
आता देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेनही समोर आला आहे. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अत्यंत घातक असल्याचं बोललं जात आहे.
आता देशातील अनेक राज्यांत कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणं जाणून घेऊया…
मुख्य लक्षणं :
ताप
कोरडा खोकला
थकवा
इतर लक्षणं :
खाज येणं आणि वेदना होणं
घशात खवखव होणं
जुलाब
डोळे येणं
डोकेदुखी
चव आणि गंध ओळखणं कठिण होणं
त्वचेचं इन्फेक्शन
हात आणि पायाच्या बोटांचा रंग बदलणं
गंभीर लक्षणं :
श्वास घेण्यास त्रास होणं
धाप लागणं
छातीत दुखणं
बोलताना किंवा चालता-फिरताना त्रास होणं