पूर्व विदर्भ

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन क्षेत्रात मुलभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य द्या  -राज्यमंत्री बच्चू कडू

लालनाला, पोथरा व डोंगरगांव प्रकल्पातील पुनर्वसनाचा आढावा

वर्धा, दि. 15 (प्रतिनिधि) :

नाल नाला, पोथरा व डोंगरगाव प्रकल्पातील प्रकल्पग्रस्थांचे पुनवर्सन करण्यात आलेल्या पुनर्वसन क्षेत्रात स्मशानभूमी, रस्ते व पाण्याचा प्रश्न निकाली काढून तसा अहवाल तात्काळ सादर करावा. तसेच ज्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अद्यापपर्यंत भूखंड व जमिनीचा मोबदला मिळाला नाही त्यांना भूखंड व मोबदला देण्याची कारवाई करावी, अशा सुचना जलसंपदा, लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी संबंधित विभागांना केल्या.

समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला, पोथरा प्रकल्प, डोंगरगाव, वरोरा तालुक्यातील चंदई प्रकल्प व पुरपिडीत वस्तीतील नागरिकांना मालकी हक्क पट्टे वितरणाबाबत आढावा बैठकीत सुचना त्यांनी केल्या. बैठकीला प्रभारी पुनर्वसन अधिकारी प्रविण महिरे, चंद्रपूरच्या सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता पाटील. वरोराचे उपविभागीय अधिकारी मेश्राम, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख प्रमोद ठूबे, हिंगणघाट तहसिलदार  गणविर आदी उपस्थित होते.

शासनाच्या हितासाठी शेतकरी आपली जमिन प्रकल्पासाठी आपले पूर्वजात गाव व संस्कृती सोडून शासनाला देते. अशा जमिनीचा मोबदला व त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची आहे. त्याचबरोबर त्यांचे पुनर्वसन केलेल्या संबंधित पुनर्वसन क्षेत्रात 18 प्रकारच्या मुलभूत सोई सुविधा निर्माण करुन द्याव्या, असे असतांना सुध्दा ब-याच पुनर्वसीत क्षेत्रात सोई सुविधा नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारीवर तात्काळ कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

लालनाला व पोथरा प्रकल्पातील पाणी सोडत असतांना प्रकल्पाच्या लगतच्या शेतामध्ये पाणी शिरुन शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतक-यांनी केली. यावर  कडू यांनी तात्काळ महसूल विभाग आणि सिंचन विभागांनी पंचनामे करुन कारवाई करावी. तसेच पुनवर्सन क्षेत्रातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव तयार करुन घरकुल मंजूर करुन दयावे. प्रकल्पग्रस्ताच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी तालुका स्तरावर शिबिर आयोजित करुन प्रमाणपत्राचे वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी पुनर्वसन विभागाला दिल्या.

हिंगणघाट येथील पूरपिडीत वस्तीतील नागरिकांना अद्यापपर्यंत जमीनीचे मालकी हक्क मिळालेले नाही. यासाठी गावठाण क्षेत्र वाढविण्याचा प्रस्ताव सादर करुन भूमि अभिलेख कार्यालयांनी मोजणी करुन कारवाई करावी, अशा सुचना  कडू यांनी दिल्या. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी मंत्रीमहोदयासमोर पूनर्वसित क्षेत्रात रस्ते, पाणी, स्मशान भूमी, जमिनीचा वाढीव मोबदला, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूखंड वाटपाबाबत समस्या मांडल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!