महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा नवीन रिकॉर्ड,

तब्बल 55 हजार 469 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज कोरोना रुग्णांची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 55 हजार 469 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आजवरची राज्यातील सर्वाधिक एकदिवसीय रुग्णवाढ आहे.

राज्यात आज 297 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 56 हजार 330 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत.

राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.86 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 24 लाख 55 हजार 498 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 22 हजार 797 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 09 लाख 17 हजार 486 नमूने तपासण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा तसेच, 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!