
परमबीर सिंह प्रकरणी राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांनी केलेल्या आरोपांची मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court)सीबीआय चौकशीला परवानगी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh Resign) यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. पण आता मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला राज्य सरकारने (MVA Goverment) सुप्रीम कोर्टात (Suprim Court) याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या याचिकेत संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला परवानगी दिली आहे. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीला पोहोचले होते. अनिल देशमुख यांनी सोमवारी रात्री उशिरा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली आहे.