नागपूर

नागपुरातील प्रसिद्ध भुलतज्ञ डॉ. अशोक जाधव यांचे निधन

नागपूर दिनांक 5 दिसंबर (प्रतिनिधि)

नागपुरातील प्रसिद्ध अनेस्थिशिया अर्थात भुलतज्ञ डॉ. अशोक जाधव ( एम डी ) यांचे नुकतेच पुणे येथे दुःखद निधन झाले । मृत्यू समयी त्यांचे वय 70 वर्षाचे होते ।डॉ.अशोक जाधव हे अनेक दिवसांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होते । त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते ।

डॉ. अशोक जाधव यांनी तब्बल 40 वर्षे नागपूरात विविध रुग्णालयात भुलतज्ञ ( अनेस्थिशिया स्पेशालिस्ट ) म्हणून कार्य केले । ते नागपूरात विविध वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत संघटनांशी जुडले होते । डॉ. जाधव यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एम. बी. बी. एस. तसेच एम. डी. ( अनेस्थिशिया ) चे शिक्षण पूर्ण केले । त्यानंतर तेथेच अनेक वर्षे भुलतज्ञ म्हणून कार्यरत होते । चांदुर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार तसेच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले स्व. भाऊसाहेब जाधव यांचे ते द्वितीय चिरंजीव होते । तर महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री स्व. एन. यु. देशमुख यांचे ते जावई होते ।

अतिशय शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे डॉ. अशोक जाधव यांना नागपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात IMA तर्फे आयोजित प्रार्थना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली । यावेळी नागपुरातील अनेक डॉक्टर सहभागी झाले होते । डॉ. अशोक जाधव यांच्या मागे त्यांचा पत्नी डॉ. वर्षा जाधव, मुलगी डॉ. जुई व जाई , तीन भाऊ , दोन बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे ।

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!