महाराष्ट्र

1 एप्रिलपासून बदलला पैसे काढण्याचा-जमा करण्याचा नियम

तुमचे पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये खाते आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

पोस्ट ऑफिस (Post Office) मधील बचत खात्याशी संबंधित काही नियमात बदल झाला आहे. हे नवे नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू झाले आहेत. India Post Payment Bank ने आता पैसे काढणे, जमा कणे आणि  AEPS (आधार आधारित पेमेंट सिस्टमवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात तुम्हाला पैसे जमा करणे आणि भरण्यासाठी देखील शुल्क द्यावे लागेल. जाणून घ्या कोणत्या खात्यांवर हे नियम लागू होणार आहेत.

जर तुमचे बेसिक सेव्हिंग खाते आहे तर तुम्हाला 4 वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्यापेक्षा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी 25 रुपये किंवा 0.5 टक्के शुल्क द्यावे लागेल. तर पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे.

जर तुमचे सेव्हिंग आणि करंट अकाउंट आहे तर दर महिन्याला तुम्ही 25000 रुपये पैसे काढू शकता. यापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी 25 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर 10 हजार रुपयांच्या कॅश डिपॉझिटवर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र त्यापेक्षा जास्त पैसे जमा करण्यासाठी कमीतकमी 25 रुपये शुल्क द्यावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!