वाशिम

अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक: वाशिम जिल्ह्यात चार मतदान केंद्र 

168 मतदार मतदानाचा हक्क बजावणार 

वाशिम दि 04 डिसेंबर (प्रतिनिधि)

विधान परिषदेच्या अकोला-वाशिम- बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी येत्या 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.जिल्ह्यात या निवडणुकीसाठी चार मतदान केंद्रास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.वाशिम येथील तहसील कार्यालय सभागृह,कारंजा येथील तहसील कार्यालय,मंगरूळपीर येथे तहसील कार्यालय आणि रिसोड येथील तहसील कार्यालय येथे हे मतदान केंद्र असणार आहे.

वाशिम येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे 58 आणि वाशिम नगर परिषदेचे 34 सदस्य,कारंजा येथील तहसील कार्यालयात कारंजा नगरपरिषदेचे 32 सदस्य,मंगरूळपीर तहसील कार्यालय येथे मंगरुळपीर नगर परिषदेचे सदस्य 21आणि रिसोड येथील तहसील कार्यालय येथे रिसोड नगर परिषदेचे 23 सदस्य असे एकूण 168 सदस्य या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.14 डिसेंबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!